अहमदनगर ब्रेकिंग : भरधाव गाडी दुभाजकावर धडकली; १ ठार ५ जखमी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- नेवासा तालुक्यात नेवासा फाटा येथे मुकिंदपूर शिवारात शिवारात नगर- औरंगाबाद रस्त्यावर भरधाव वेगातील ट्रक्स क्रुझर गाडी नं. एमएच २७ एआर ९७४९ हिच्यावरील चालकाने मुंबई येथून औरंगाबादकडे जात असताना

रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगात गाडी चालविल्याने गाडी रस्त्याच्या दुभाजकाला धडकली व मोठा अपघात झाला.

या.अपघातात गाडीतील साहेबराव जगदेव डोंगरे (वय ६०) रा. एबलापूर, ता. अकोले, जि.अकोला हे जागीच ठार झाले तर बाजीराव सूर्यभान दामोधर, (वय ६७ रा. एबलापूर) यांच्यासह प्रमिला दामोधर, मंगल वानखिंडे, श्रीकांत रणगिरे,

पांडुरंग दागडे हे ५ जण गंभीरीत्या जखमी झाले आहे. जखमी बाजीराव सूर्यभान दागडे यांच्या फिर्यादीवरून गाडीचालक आरोपी प्रदीप बाजीराव दामोधर, रा. एबलापूर, ता. जि. अकोला याच्याविरुद्ध नेवासा पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment