अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस भाजपच्यावतीने जिल्ह्यात दि. 14 ते 20 सप्टेंबर या कालावधीत सेवासप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे व प्रसिध्दी प्रमुख सचिन पोटरे यांनी दिली.
प्रत्येक मंडलात 70 दिव्यांगांना विविध प्रकारचे कृत्रीम अवयव, गरीब व गरजूंना चष्मे वाटप, रूग्णांचा फळांचे वाटप, करोना बाधितांना प्लाझ्मादान, आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. युवा मोर्चातर्फे 70 रक्तदान शिबिर, प्रत्येक बूथवर 70 वृक्षांची लागवड,
पर्यावरण रक्षणाचा संकल्प, प्लास्टिकमुक्त संकल्प, स्वच्छता अभियान, आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पंडित दिनदयाळ उपाध्याय, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि. 25 ते 2 ऑक्टोबर दरम्यान विविध उपक्रमांनी साजरी करून या दरम्यान,
पंतप्रधान मोदी यांचा आत्मनिर्भर भारतचा संकल्प विविध प्रकारच्या संवाद कार्यक्रमातून जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार असून यामध्ये खादीचा उपयोग, स्वदेशीचा वापर, स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन या अभियानाचा प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे, असे सचिन पोटरे यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्हा भाजपच्या बैठकीत जिल्हा प्रभारी व तालुकानिहाय निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ती पुढील प्रमाणे: प्रसाद ढोकरीकर (जिल्हा प्रभारी), पारनेर – बाळासाहेब महाडीक, दादासाहेब बोठे, राहुरी-
दिलीप भालसिंग, संतोष लगड, श्रीगोंदा- सचिन पोटरे, शेवगाव- शाम पिंपळे, युवराज पोटे, पाथर्डी- रविंद्र सुरवसे, पांडुरंग उबाळे, नगर- अशोक खेडकर, सुनील थोरात, जामखेड- वाय. डी. कोल्हे, धनंजय बडे, कर्जत- सुभाष गायकवाड, संतोष रायकर आदिंची नियुक्ती करण्यात आली.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved