अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- कांगोणीचे सरपंच आप्पासाहेब कारभारी शिंदे यांना 12 जणांनी गावठी कट्टा लावून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
महादेव मंदिरासाठी वर्गणीच्या कारणावरून मंगळवारी झालेला वाद आपसात मिटला असताना बुधवारी (9 सप्टेंबर) काही लोकांनी बेकायदा जमाव जमवून आपणाला गावठी कट्ट्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले
व सोडविण्यास आलेल्या पत्नी व आईलाही मारहाण करुन जखमी केले अशी फिर्याद सरपंचानी शिंगणापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादीवरून 12 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, सरपंचांसह तिघांनी किरकोळ कारणावरून झटापट करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद दिगंबर कुसळकर यांनी दिली आहे. या फिर्यादीवरून त्यावरून अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीनुसार याबाबत अधीक माहिती अशी की, आप्पासाहेब कारभारी शिंदे हे दहाव्याच्या कार्यक्रमात असताना दिगंबर कुसळकर यांनी महादेव मंदीर बांधण्यासाठी वर्गणीची मागणी केली.
त्यातून वाद व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मात्र काहींनी हा वाद मिटविला. मात्र बुधवारी अरुण दिगंबर कुसळकर, जनार्दन दिगंबर कुसळकर, दिलीप चिमा कुसळकर, मच्छिंद्र चिमा कुसळकर,
आकाश मच्छिंद्र कुसळकर, संदीप दिगंबर कुसळकर वरील सर्व 6 जण रा. कांगोणी ता. नेवासा तसेच गंगा धनवटे (रा. सोनई), देवा लष्करे,
विकास लष्करे, कैलास लष्करे, सागर लष्करे, सुनील शिंदे (पाचही जण रा. नेवासा) तसेच दिगंबर याची बहिण सुनीता अशोक धनवटे रा. एमआयडीसी अहमदनगर व त्यांचे इतर 7 ते 8 साथीदार यांनी मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved