गाडीची चावी न दिल्याने सरपंचानी केली मारहाण; गुन्हा दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- कांगोणीचे सरपंच आप्पासाहेब शिंदे यांनी गाडीची चावी न दिल्याच्या रागातून एकास मारहाण केल्याची घटना घडली आहे. तशी फिर्याद दिगंबर सोन्याबापू कुसळकर यांनी शिंगणापूर पोलीस ठाण्यात दिली आहे.

यावरून सरपंच आप्पासाहेब शिंदेंसह रामदास बबन सोनवणे व संभाजी सोनवणे या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीत म्हटले आहे

की आप्पासाहेब शिंदे यांचे घरासमोर फिर्यादी दिगंबर सोन्याबापू कुसळकर यांच्या गाडीची चावी काढून घेऊन गाडीची चक्कर मारू द्या असे म्हटले.

मी गाडीची चावी दिली नसल्याचा राग आलेने मला शिवीगाळ करून झटापट करून जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास हवालदार झरेकर करत आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment