शहरातील या ठिकाणी पोलीस उपाधिक्षकांनी टाकला छापा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :- शहरातील टिळक रोडनजिकच्या जुगार आड्यावर गुरुवारी (दि.१०) पोलिसांनी छापा मारला. या छाप्यात पकडण्यात आलेल्या १३ जुगा-यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या जुगाऱ्यांकडून तब्बल ३ लाख १३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, विनायक वाशिंग सेंटरच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्यावर पोलिसांनी छापा टाकला.

या छाप्यात रोख रक्कम,मोबाईल,मोटारसायकल व जुगार खेळण्याचे साधने असे एकूण ३ लाख १३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतले.

१३ जुगा-यांना ताब्यात घेतले आरोपी नामे दत्तात्रय रामदास गवळी, इम्रान इसाक शेख, सचिन नारायण खूपसे, प्रकाश रामलाल शहा, हसन बाबू शेख, संकेत अच्युत भांबरकर,

किसन धर्माईया बत्तीनं, विशाल दयानंद छेत्रे, सूर्यकांत प्रभाकर बिलाडे, सत्तर मिरसाब शेख, सय्यद हजर अकबर, सद्दाम शिकदर खान, हरी राम दिवटे या सर्वांविरुध्द कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री अखिलेशकुंमार सिह, व श्री अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या आदेशान्वये , उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली,पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कणसे ,

पोलीस उपनिरीक्षक निलेश वाघ तसेच आरसीपी पथकाचे कर्मचारी पोना शेलार ,पोशी परभणे, पोशी भोजे, पोशी खेडकर , पोशी गरजे , पोशी वडते यांनी सदरची कारवाई केली आहे

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment