आ. काळेंचा पैशांसाठी कोरोनाचा उपचार टाळणाऱ्या रुग्णालयांना सल्ला; म्हणाले…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. कोपरगाव तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही. काही महिन्यापूर्वी कोपरगाव तालुक्याने योग्य नियोजन करत तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केला होता परंतु पुन्हा कोरोनाने या ठिकाणी आपले पाय रोवले आहेत.

मागील काही आठवड्यांपासून कोपरगाव तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून ही वाढणारी संख्या चिंताजनक आहे. कोरोना बाधित रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले नाही तर वेळप्रसंगी त्या रुग्णाला आपला जीव गमवावा लागत आहे.

अशा परिस्थितीत आपल्या हॉस्पिटलमध्ये येणार्‍या कोरोना बाधित रुग्णांकडे अनामत रक्कम कमी आहे म्हणून उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये भरती घेण्यास नाकारू नका. वैद्यकीय सेवा करीत असताना पैशाकडे न पाहता माणुसकी जोपासा,

असा सल्ला आमदार आशुतोष काळे यांनी पैशांसाठी कोरोनाचा उपचार टाळणाऱ्या रुग्णालयांना सल्ला दिला आहे. कोपरगाव कोव्हिड सेंटर येथे रुग्णांना दिल्या जात असलेल्या सोयी सुविधांचा आढावा आ.काळे यांनी घेतला. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, डॉ.कृष्णा फुलसौंदर,

तालुका आरोग्याधिकारी डॉ.संतोष विधाते, डॉ.वैशाली बडदे, डॉ. गायत्री कांडेकर, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम आदी उपस्थित होते. त्याचबरोबर आत्मा मलिक रुग्णालयात पैशाअभावी अनेक रुग्णांना उपचार नाकारण्यात येत असल्याच्या तक्रारीची दखल घेऊन

आ. काळे यांनी आत्मा मलिक हॉस्पिटलच्या प्रशासनाशी चर्चा केली. कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी ठराविक रक्कमच घ्यावी हे शासनाच्यावतीने बंधनकारक करण्यात आलेले आहे. तेवढीच रक्कम आकारा. आज डॉक्टर सोडून आपल्याला कुणीही वाचवू शकत नाही अशी प्रत्येक कोरोना बाधित रुग्णाची मनस्थिती आहे.

अशावेळी पैशाअभावी कोरोनाबाधित रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवणे योग्य नाही. त्यामुळे यापुढे रुग्णांकडे अनामत रक्कम भरण्यासाठी पैसे कमी असले तरी रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घ्या व रुग्णसेवेच्या माध्यमातून माणुसकी जोपासा असा सल्ला आमदार आशुतोष काळे यांनी आत्मा मलिक हॉस्पिटल प्रशासनाला दिला.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment