‘तो’ मृतदेह तब्बल दीड दिवसाने सापडला

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून नदी पात्रात पडून वाहून गेल्याने अनेकांचे प्राण गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत. हे सर्व असताना पुन्हा एकदा अशीच एक घटना घडलेली आहे.

नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील बाळासाहेब धोंडीराम माळी (वय ५७ वर्षे) ही व्यक्ती गेल्या बुधवारी (दि.९ सप्टेंबर) रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान प्रवरा नदीपात्रात अंघोळीसाठी गेली असता पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली होती.

गेल्या दोन दिवसांपासून पाचेगावातील युवकांकडून नदीपात्रात शोधमोहीम सुरू होती. आज तब्बल दीड दिवसांनी या शोध मोहिमेला यश आले आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी कि, शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान नेवासा येथील मध्यमेश्वर बंधाऱ्यात सदर व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.

मृतदेह शवविच्छेदनासाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर, पो कॉ. ज्ञानेश्वर देवकाते, इसमाचे नातेवाईक हजर होते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment