राहुरी :- देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री मागील ५० वर्षांत महाराष्ट्राला लाभला नाही, असे सांगत निळवंडे कालव्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याने ही जनादेश यात्रा असली, तरी जनतेने आभार यात्रा म्हणून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे यांनी बुधवारी केले.
मी आमदार कर्डिंलेचे नाव कायम घेत असताना माझे नाव घेण्याची आठवण त्यांना करून द्या, असा टोला डॉ. विखे यांनी मारताच बैठकीत हास्यकल्लोळ झाला. महाजनादेश यात्रा २५ ला दुपारी राहुरीत येत असून तिच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत डॉ. विखे बोलत होते.

अध्यक्षस्थानी आमदार शिवाजी कर्डिले होते. विखे व कर्डिले एकाच वाहनातून आल्याने कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या कडकडाट केला. डॉ. विखे म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर कर्डिले व माझ्याबाबत चर्चेला उधाण आले. अनेकांनी विपर्यास केला.
तुम्ही विधानसभा निवडणुकीत काय करणार असा सवाल काहींनी केला. जो माणूस गेली अनेक वर्षे जनतेत आहे, त्यांना जनता निवडून देणारच आहे. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून निवडणुका लढवू नका. राहुरीच्या विकासासाठी विखे-कर्डिले ही जोडी कायम राहील.
- रथयात्रेच्या काळात ‘या’ राशींना लाभतो भगवान जगन्नाथांचा विशेष आशीर्वाद, होतात मालामाल!
- बांगलादेशमध्ये राजकीय गोंधळ, टीम इंडियाच्या दौऱ्यावर सस्पेन्स; जाणून घ्या सामन्यांचे वेळापत्रक
- महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ 2 प्रलंबित मागण्या पावसाळी अधिवेशनात पूर्ण होणार ?
- तब्बल ताशी 1,670 किमी वेगाने फिरते पृथ्वी, तरीही आपण इतकं स्थिर कसं जगतो? आर्यभट्ट यांनी 5 व्या शतकातच दिलं होतं याचं उत्तर!
- मुकेश अंबानी कोणत्या राशीचे आहेत?, त्यांच्या यशामागे लपलंय राशीचं रहस्य! जाणून घ्या अंबानी कुटुंबाच्या राशी