नगर-मनमाड महामार्गासाठी आता आ. विखे उतरणार रस्त्यावर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- रस्त्यांची दुरवस्था हा अहमदनगर जिल्ह्याला लागलेला शाप आहे. जिल्ह्यातील अनेक महामार्ग खराब झाले आहेत. नगर-मनमाड महामार्गाचीही अशीच दुरवस्था झाली आहे.

खड्ड्यांचा महामार्ग म्हणून या ममार्गाची आता ओळख झाली आहे. अनेक अपघातही या महामार्गावर झाले आहेत. या महामार्गावरून वाहने चालवणे म्हणजे वाहनांचा खुळखुळा करण्यासारखे आहे

असे मत प्रवासी व्यक्त करतात. नागरिकांमध्ये याबद्दल असंतोष असून या महामार्गाची दुरवस्था लवकर दूर करावी अशी मागणी वारंवार नागरिकांमधून होत आहे.

आता वाहतुकीच्या दृष्टीने अडचणीच्या झालेल्या रस्त्याच्या परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

यासंदर्भात आ. विखे पाटील यांनी थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांना या मार्गाच्या परिस्थितीचे फोटो आणि व्हीडीओची सीडी पत्रासोबत पाठवून या रस्त्याच्या दुरवस्थेकडे विभागाच्या अधिकार्‍यांनी केलेल्या

दुर्लक्षाकडे लक्ष वेधले आहे. जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना रस्त्यांच्या कामासाठी निधीची उपलब्धता करून देण्यात आली असून

शिर्डी विधानसभा मतदार संघातून जाणारा नगर-मनमाड राज्य मार्गाच्या कामाची निविदा मंजूर असतानाही या रस्त्याच्या कामाला कुठलाही निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही,

अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे प्रशासनाला आंदोलनाचीच भाषा कळत असेल तर आता कोणतीही पुर्वसूचना न देता कोणत्याही क्षणी नगर-मनमाड मार्गावर रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा आ. विखे पाटील यांनी पत्राद्वारे दिला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment