अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा व सुविधा देण्यास राज्य सरकार व लोकप्रतिनिधी कमी पडले असून अकोले तालुक्याची आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवर आहे.
अकोले तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर व्यापारी असोसिएशनच्या या बंदच्या निर्णयामुळे अकोले शहर येणारे 7 दिवस बंदच राहणार आहे.
परंतु याला अनेक जण विरोध करत आहेत. राजकीय आकसापोटी या बंद ला विरोध का करावा? उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती लॉकडाऊन होऊ शकते,
जयंत पाटील यांची सांगली बंद होऊ शकते मग अकोले तालुक्यात विरोध का? असा असा सवाल माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केला आहे. मनोहरपूर येथे सेवा सप्ताह कार्यक्रम शुभारंभप्रसंगी पिचड बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे होते. यावेळी भाजपचे जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाकचौरे, सभापती उर्मिला राऊत आदी उपस्थित होते. पिचड म्हणाले कि.
आज अकोले शहरात व तालुक्यात आजपर्यंतचे सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह आलेली संख्या आहे. तेव्हा आता जर बंद ठेवले नाही तर याचे परिणाम येणार्या काळात भोगावे लागतील
आणि तालुक्याच्या लोकप्रतिनिधीने अकोले तालुक्यातील आरोग्य सुविधा देण्यासाठी काय उपाययोजना केल्या. ते जनतेला एकदा सांगावे, मगच बंदला विरोध करावा.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved