अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- राहाता तालुक्यात नगर-मनमाड रस्त्यावर अपघाताची मालिका सुरूच असून कोल्हार बु. येथील इम्पिरयिल चौकात दुचाकी रस्त्याच्या कडेने जात असताना भरधाव वेगातील मालटूक नं. सीएन ५२ पी ३५३९ हिच्यावरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत समोर चाललेल्या मोटरसायकलला पाठीमागून धडक देऊन उडविले.
धडक इतकी जोराची होती की दुचाकीवरील सौरभ विजय घेटे, (रा. भगवती कोल्हार, वय ४५ हे) जागोच ठार झाले. हा अपघात आठ वाजण्याच्या सुमारास झाला.
या अपघातप्रकरणी अरूण मछिंद्र थेटे यांनी लोणी पोलिसात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून ट्रकचालवर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली असून या घटनेचा पुढील तपास पोना कुसळकर हे करीत आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved