अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने चांगलीच कंबर कसली आहे. दरम्यान पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे सापळा लावून गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले.
आकाश आण्णा धनवटे (वय २३, रा.मिरी, ता.पाथर्डी) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, गावठी कट्टा बाळगणारा मिरी (ता.पाथर्डी) बसस्थानक परिसरात फिरत आहे,
अशी माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने मिरी बसस्थानक परिसरात सापळा लावून पंचसमक्ष धनवटे याची अंगझडती घेतली,
यावेळी देशी बनावटीचा गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस मिळून आल्याने ते जप्त करून, पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील, शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे
पो नि.दिलीप पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक पोहेकाॅ मनोज गोसावी, पोना सचिन आडबल, लक्ष्मण खोकले, विशाल दळवी,
रविकिरण सोनटक्के, पोकाॅ रणजित जाधव, संदिप दरदंले, सागर सुलाने, चापोहेकाँ बाळासाहेब भोपळे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved