कांदा निर्यातबंदीचा माजी आमदारांनी निषेध करावा’

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-  सत्तेत असताना शेतकऱ्यांसाठी ज्यांना करता काही आले नाही उलट यशस्वी होत असलेल्या शेतकरी संपात मिठाचा खडा टाकून शेतकरी संप मोडणाऱ्या माजी आमदार मागील काही दिवसापासून शेतकऱ्यांबाबत गळा काढत आहे.

त्यांना शेतकऱ्यांविषयी जर मनापासून आत्मीयता असेल तर केंद्राने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीचा त्यांनी निषेध करावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकाध्यक्ष चारुदत्त सिनगर यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांना केले.

केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाने सोमवारी कांदा निर्यातीवर बंदी घालण्याच्या निर्णय घेतल्यामुळे कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली. याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला. कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा त्यांनी निषेध करावा, असे सिनगर यांनी केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment