अहमदनगर जिल्ह्यातील ‘ते’ कोविड सेंटर बंद करण्याचे आदेश !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- शहरात सुरू करण्यात आलेल्या दोन अनधिकृत खासगी कोविड सेंटरला परवानगी देऊ नये, असे आदेश प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी बुधवारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ यांना दिले.

शहरातील खाडेनगर व बँक ऑफ महाराष्ट्रशेजारी खासगी कोविड सेंटर उभारण्यात येत होते. या संदर्भात स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण बोलभट, आम आदमी पक्षाचे बजरंग सरडे,

तसेच रत्नदीप फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे आदींनी लोकवस्तीत कोविड सेंटर उभारण्यात येऊ नये, असे निवेदन तहसीलदार विशाल नाईकवाडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वाघ यांना दिले होते. तथापि,

या कोविड सेंटरच्या पदाधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना काम सुरू केले. अधिकारीही टोलवाटोलवी करत होते. त्यामुळे बोलभट, सरडे,

डॉ. चंद्रशेखर नरसाळे यांनी मंगळवारी परिसरातील रहिवाशांसह प्रांताधिकारी नष्टे यांची भेट घेऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याची विनंती केली. नष्टे यांनी पाहणी केली असता खाडेनगरमधील कोविड सेंटरमध्ये रुग्ण आढळला.

असे अनधिकृत सेंटर चालवता येणार नाही. रुग्ण येथून ताबडतोब हलवा, असे नष्टे यांनी तेथील डाॅक्टरांना सांगितले. महाराष्ट्र बँकेशेजारी असलेल्या सेंटरमध्ये डॉक्टर नव्हता.

हे सेंटरही बंद करून अहवाल सादर करण्याचे आदेश नष्टे यांनी दिले. अनधिकृत कोविड सेंटर उघडून अव्वाच्या सव्वा बिले घेतली जातात.

संबंधितांवर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने स्थानिक अधिकाऱ्यांनी भूमिका संशयास्पद दिसते. अनधिकृत कोविड सेंटर बंद केले नाही, तर सेंटरसमोरच उपोषण करण्याचा इशारा बोलभट यांनी दिला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment