नगर – गोंडेगाव येथील पाझर तलाव भरून देण्यासाठी केलेल्या रास्तारोकोप्रसंगी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी तलाव भरण्याचे लेखी अश्वासन देऊनही त्याची पूर्तता न केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीवर ग्रामस्थांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय ग्रामसभेत एकमुखी घेतला.
गोंडेगाव परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने पाणी टंचाईमुळे संतप्त शेतकर्यांनी दि. 17 ऑगस्ट रोजी श्रीरामपूर – पुणतांबा राज्यमार्गावर रस्तारोको आंदोलन केले होते. त्यावेळी राहाता पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता गायकवाड यांनी श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या समोर लेखी आश्वासन देऊन ओव्हर फ्लोच्या पाण्याने 50 तासांत पोहच करतो, असे लेखी आश्वासन दिले होते.

मात्र, पाणी चारी क्रमांक 20 ला पोहचताच शेतीचे आवर्तन सुरू करून लाभधारक शेतकर्यांची फसवणूक केल्याने गोंडेगाव येथील संतप्त शेतकर्यांनी ग्रामसभा घेऊन त्यात जर टेलच्या भागातील सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून न मिळाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार
तसेच गावात सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी, गावातील जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक विद्यालय, गाव बंदचा ठराव केला आहे. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असताना बंधारे भरून देण्याऐवजी ओव्हरफ्लोच्या पाण्यात शेतीचे पाणी आर्वतन चालू केले.
म्हणून गोंडेगाव येथील संतप्त शेतकर्यांनी काल सकाळी गावातील ज्येष्ठ नागरिक कारभारी दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा घेऊन बंधारे भरून मिळाले नाही तर आगामी विधान सभा निवडणुकीवर, सर्वपक्षीय राजकीय नेत्यावर गावबंदी, गावातील जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक विद्यालय, गावातील सर्व दूध संकलन केंद्र, गावातील आठवडे बाजार बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
तसेच जेष्ठ नेते रावसाहेब बढे हे उपोषणास बसणार आहे याची सर्व जबाबदारी पाटबंधारे विभागाची राहील, असे ग्रामस्थांनी ठराव करून सांगितले आहे. यावेळी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने ग्रामसभेला उपस्थित होते.
- Dental Health : पिवळसर दातांवर घरबसल्या इलाज! ही फळं खाल्लीत तर दात होतील पांढरेशुभ्र!
- Brush Tips : दात घासताना किती टूथपेस्ट वापरली पाहिजे ? एक चूक तुमचे दात कायमचे खराब करू शकते…
- शिर्डी विमानतळावर दोन हेलिपॅड व आठ वाहनतळ उभारण्यास मान्यता
- UIIC Apprentice Jobs 2025:पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! इन्शुरन्स कंपनीत मोठी भरती सुरू
- मे महिना मुंबईकरांसाठी ठरणार स्पेशल ! 06 मे 2025 पासून ‘या’ मार्गावर धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, 13 Railway Station वर थांबणार