अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-१७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस असल्याने भाजपाकडून देशभर सेवा दिवस म्हणून साजरा होत आहे.
देशातील आर्थिक परिस्थिती, लॉकडाऊन तसेच केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे लाखो लोकांना रोजगार गमवावा लागला आहे.
या पार्श्वभूमीवर छात्रभारती विद्यार्थी संघटनेने मोदींचा वाढदिवस गुरुवारी राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा केला. द केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर छात्रभारती विद्यार्थी संघटनेने राज्यभरात नरेंद्र मोदींचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा करत आहे.
यासाठी कार्यकर्ते, समविचारी संघटना व संस्थांनी सोशल मीडियातुन प्रश्नावर प्रभावी आवाज उठवावा. असे आवाहन छात्रभारतीचे सचिव रशिद मणियार यांनी केले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved