नवी दिल्ली – नोटाबंदी आणि जीएसटी यासारखे धाडसी निर्णय राबवणारे देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले.
ते ६६ वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं ९ ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतीलएम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार केले गेले, पण त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२ मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ’ची पदवी घेतली.
त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते.
- 25,000 सैन्यासह युद्धभूमीत उतरलेली हिंदू राणी, जिचे शौर्य पाहून मोहम्मद घोरी युद्धभूमी सोडून पळाला!इतिहासात हरवलेली ही शूर नायिका कोण?
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! इतक्या दिवस सुट्ट्या घेतल्या नोकरी जाणार
- तळहातावरील ‘ही शुभ चिन्हे व्यक्तीला बनवतात श्रीमंत, देवी लक्ष्मी यांच्यावर असते सदैव प्रसन्न!
- भावनिक पण जबरदस्त बिझनेस माइंड घेऊन जन्मतात ‘या’ मूलांकच्या मुली! जाणून घ्या त्यांच्या यशामागील गुपित
- LIC HFL Apprentice Job 2025: LIC – हाउसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत 250 जागांसाठी भरती सुरू; लगेच अर्ज करा..