अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- दिनांक १७/९/२०२० रोजी एका महिलेने फिर्याद दिली कि, अज्ञात मोबाईल धारकाने एका व्हाट्सअँप ग्रुपवर मध्ये जोडले आणि त्या ग्रुपवर फिर्यादी महिलेचा चेहरा लावलेला व खाली नग्न अवस्थेतील दुसरा फोटो लावलेला असे फोटो फिर्यादी यांना पाठवून सदर फोटो फेसबुकवर व्हायरल करण्याची धमको देवून दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली.
या फिर्यादीवरून सायबर पोलीस स्टेशन 1 गुरंन १९/२०२० भादवि कलम ३५४(अ)(१)(३), ३५४(ड)(१)(२)५०४, ५०६, ५०९ माहिती तंत्राज्ञान का. क. ६७ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. वरील प्रमाणे गुन्हा दाखल झालया नंतर मा.श्री.अखिलेश कुमार सिंह सो, पोलीस अधीक्षक ,
अहमदनगर, मा.श्री. सागर पाटील सो. अपर पोलीस अधीक्षक , अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे श्री. अरूण परदेशी, पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन यांचे नेतृत्वाखाली पोसई, श्री. प्रतिक कोळी , पाहेकॉ योगेश गोसावी, पोना मल्लिकार्जुन बनकर, दिंगबर कारखेले, विशाल अमृते, पोकॉ.
भगवान कोंडार, म.पोकॉ. पुजा भांगरे चापाहेका वासुदेव शेलार या पथकाने सदर गुन्हयाचे तांत्रीक विश्लेषण केले. सदर आरोपी निळवंडे ता. अकोले परीसरात असल्याचे निष्पन्न झाल्याने वरील नमुद पथकाने निळवंडे ता. अकोले येथे जावून तांत्रीक विश्लेषण व बातमीदाराकडे माहिती घेवून सदर पिपंरी परीसरात सापळा लावून
आरोपी कार्तीक उर्फ दिपक सोमनाथ मेंगाळ वय २२ रा. निळवंडे ता. अकोले यास ताब्यात घेतले व त्याचेकडे सदर गुन्हयाचे अनुंषगाने तपासकरता त्यांने सदर गुन्हा केल्याचे कबूल केले असून सदर आरोपी याने स्वत:च्या मोबाईल मध्ये दुस-या व्यक्तीच्या नावाचे सिमकार्ड वापरून सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले.
त्याचेकडून गुन्हयात वापरलेला मोबाईल व सिमकार्ड हस्तगत करण्यात आले आहे.सदर आरोपी दुर्गम भागातील असून केवळ १० वी. शिक्षण झालेला असताना सुध्दा त्यांनी अशा प्रकाराचा गुन्हा केलाआहे. त्याने अशा प्रकारे किती लोंकाना त्रास दिला आहे आहे याबाबत सखोल तपास करण्यात येत आहे.
सदर कामगिरी मा.श्री. अखिलेश कुमार सिंह सो, पोलीस अधीक्षक , अहमदनगर, मा.श्री. सागर पाटील सो. अपर पोलीस अधीक्षक , अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे श्री. अरूण परदेशी, पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन यांचे नेतृत्वाखाली पोसई, श्री. प्रतिक कोळी , पाहेकां योगेश गोसावी, पोना मल्लिकार्जुन बनकर, दिंगबर कारखेले, विशाल अमृते, पोकॉ. भगवान कोंडार म.पोकॉ. पुजा भांगरे , चापाहेकां बासुदेव शेलार या पथकाने केली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved