अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :- देशांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा होत आहे. विविध गटांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत जामखेड शहराला पहिल्या दहा क्रमांकात स्थान मिळवून देण्यासाठी व जामखेडची वेगळी ओळख निर्माण होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे
व ही लोक चळवळ झाली पाहिजे, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. स्वच्छ सर्वेक्षण २०२१ च्या स्पर्धेच्या तयारीसाठी आ.रोहित पवार यांच्या उपस्थितीत समन्वय बैठक घेण्यात आली होती.
विधानसभा प्रमुख प्रा.मधुकर राळेभात, नगराध्यक्ष निखिल घायतडक, रमेश आजबे, नगरसेवक अमित जाधव सर्व पक्षांचे पदाधिकारी,शासकीय अधिकारी, व्यापारी संघटना आदी यावेळी उपस्थित होते.
या स्पर्धेबाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी गारबेज क्लिनचे संचालक प्रविण नायक, स्वच्छ सर्व्हेक्षण कॅन्सलटंट एबी फर्मचे भूषण देशमुख या बैठकीत सहभागी झाले होते.
भूषण देशमुख यांनी भारतात सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेची माहिती देत “कचरा मुक्त शहर’ ही मोहीम आगामी काळात राबवण्यात येणार असल्याचा
संकल्प व्यक्त करताना जामखेड शहराला आदर्श मॉडेल करण्याचा विचार मांडला.यासाठी विविध ठिकाणी सुरू असलेल्या उपक्रमांची व्हिडिओद्वारे माहिती दिली.
स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेची नामांकने, याचे निकष व या स्पर्धेत घ्यावयाची काळजी अशा विविध बाबींची माहिती यावेळी उपस्थितांना दिली. पुढच्या काही दिवसात जामखेडचा चेहरा-मोहरा बदलणार असल्याचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved