अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :- उच्च न्यायालयाने लागू केलेल्या सुधारित नियमावली नुसार सोमवार दि.२१ सप्टेंबर पासून जिल्हा व तालुका ठिकाणच्या न्यायालयांचे नियमित कामकाज सुरू होणार आहे.
न्यायालयातील सुनावणीचे कामकाज सकाळी साडेदहा ते दीड व दुपारी अडीच ते सायंकाळी साडेपाच अशा दोन सत्रात होणार आहे. ज्या प्रकरणांची सुनावणी होणार आहे,
त्या दिवशी त्याच संबंधित वकील व पक्षकारांना न्यायालयीन इमारतीत प्रवेश दिला जाणार आहे. लॉयर्स सोसायटीच्या कामकाजासही सुरवात होणार आहे.
नगर जिल्हा न्यायालयाच्या कामकाजाच्या नियोजनासाठी नुकतीच प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीकांत अणेकर यांच्या उपस्थितीत वकील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह महत्वाची बैठक झाली.
सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या नियमावलीची माहिती जिल्हा व तालुका न्यायालयांना कळविण्यात आली आहे. न्यायालयाच्या
आवारात प्रवेश करण्यापूर्वी गेटवरच प्रत्येक वकील व पक्षकाराची तापमानाची व ऑक्सिजनच्या पातळीची नोंद घेतली जाणार आहे.
न्यायालयीन इमारतीत सामाजिक अंतर, मास्क, हात धुणे व सॅनिटायझरचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. सर्वांनी नियमांचे काटेकोर पणे पालन करणे बंधनकारक आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved