अहमदनगर :- भारतीय जनता पक्षाने अलीकडच्या काळात तीन बहुमोल हिरे गमावले आहेत. यातील अरुण जेटली हे अर्थतज्ज्ञ, अभ्यासू व विचार प्रगल्भ विचारवंत नेते होते. अशा महान नेत्याच्या निधनाने पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.
त्यांच्या निधनाने पक्षाने अष्टपैलू नेता गमावला आहे, अशा शब्दांत शहर भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी स्व.अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहिली.

शहर भाजपतर्फे माजी अर्थमंत्री स्व. जेटली यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लक्ष्मी कारंजा येथील कार्यालयात शोकसभेचे आयोजन केले होते. शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी स्व. जेटली यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
या शोकसभेत उपमहापौर मालन ढोणे, सरचिटणीस किशोर बोरा, महिला आघाडीच्या अध्यक्ष गीतांजली काळे, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, हरिभाऊ डोळसे, शिवाजी दहिंडी आदींनी जेटली यांच्या आठवणींना व कार्याला उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
माजी खासदार गांधी म्हणाले, तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कायदा मंत्री म्हणून आपल्या आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवत संपूर्ण देशातील न्यायालयात जलदगतीने न्याय होण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत मोलाचे योगदान दिले.
त्यांची संसदेमधील अभ्यासपूर्ण भाषणे सर्व खासदारांना मार्गदर्शक असायची. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.
अर्थमंत्री म्हणून त्यांनी घेतलेल्या जीएसटी टॅक्समुळे संपूर्ण देशाची आर्थिक घडी बसली आहे. नोटबंदी निर्णयही त्यांनी अत्यंत सक्षमपणे हाताळला. असे बहुआयामी अष्टपैलू व अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्यातून गेल्याचे फार दुःख होत आहे.
- सोन्याच्या किंमतीत मोठा बदल ! 20 एप्रिल 2025 रोजीचे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 10 ग्रॅम सोन्याचे रेट चेक करा
- आता टेन्शन मिटणार ! 27 वर्षांची प्रतीक्षा संपली, 28 एप्रिल 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश, आयुष्य पूर्ण बदलणार, वाचा सविस्तर
- महाराष्ट्रातील 17 लाख राज्य कर्मचारी आणि 12 लाख पेन्शन धारकांसाठी महत्त्वाची बातमी ! महागाई भत्ता वाढ झाली निश्चित, किती वाढेल DA ?
- गुड न्यूज ! अहिल्यानगरला मिळणार नवा रेल्वे मार्ग, ‘या’ शहरांमधून जाणार नवा Railway मार्ग, सरकारने दिली मंजुरी, कसा असेल रूट ? पहा…
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! आठव्या वेतन आयोगात सरकार ‘या’ 35 पदावर करणार नवीन नियुक्त्या