अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिचलेला शेतकरी आता पुन्हा नव्या जोमाने उभा राहू पाहत आहे. आता पर्यंत अनेक पिकांनी बळीराजाची नाराजी केली. शेतकऱ्यांचे उत्पादन देणारे पीक कांदाही मागील काही दिवसांत 3-7 रुपये प्रति किलो होता.
परंतु आता कुठे कांद्यास चांगला भाव मिळू लागला असतानाच मोदी सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणल्यामुळे शेतकऱ्यांचा वांदा झाला.
याच पार्श्वभूमीवर ‘ग्राहकांना दिलासा देण्यासाठी बाजारातील कांद्याचा पुरवठा सुरळीत व भाव आटोक्यात राहणे आवश्यक आहे. मात्र, या निर्णयाने कांदा उत्पादक शेतकर्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
गरज पडल्यास केंद्र सरकारने नाफेडच्या मार्फत खरेदी केलेल्या एक लाख क्विंटल कांदा बाजारात आणून किमती स्थिर कराव्यात. मात्र, कांदा निर्यात बंदीचा निर्णय तातडीने रद्द करावा,’ अशी मागणी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिल्ली
येथे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन केली. केंद्रीय वाणिज्य मंत्री यांनी याबाबत सकारात्मक विचार करून दोन दिवसांमध्ये शेतकर्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल,
असे आश्वासन खा. विखे पाटील यांना दिले आहे. उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये विक्रमी कांदा उत्पादन झालेले असून शिल्लक आहे व या शेतकर्यांना दोन पैसे मिळू शकतील याकडे खा. विखे यांनी मंत्री यांचे लक्ष वेधले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved