नगरकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी महसूलमंत्री थोरात सरसावले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-  नगरकरांच्या समस्यां सोडविण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे खुद्द रिंगणात उतरले आहे. तसेच नगर शहरातील विविध प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी पुढाकार घेण्याबाबत मंत्री थोरात यांनी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांना आदेश दिले आहे.

तसेच प्रशासनाच्या विविध स्तरावर बैठका लावण्यासाठी मी स्वतः संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करेल, असेही थोरात यांनी सांगितले आहे.

यामुळे नगर शहरातील महापालिकेच्या कामात ना. थोरातांनी लक्ष घालण्यास सुरुवात केल्याचे दिसू लागले आहे. थोरातांच्या या एन्ट्रीमुळे शहरातील राजकारणावरही त्याचे पडसाद उमटणार आहेत.

प्रोफेसर कॉलनी चौकातील भाजी विक्रेत्यांच्याविषयावरून काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मध्यंतरी महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर व त्यांना पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीवर टीका केली होती.

या पार्श्वभूमीवर, ना. थोरात यांनी नगर शहरातील काँग्रेस पक्षाला ताकद देण्याच्या उद्देशाने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांना शहरातील विविध प्रश्नांबाबत अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याच्या केलेल्या सूचनेला विशेष महत्त्व आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने हाती घेतलेल्या माझं कुटुंब, माझी जबाबदारी अभियानात शहर काँग्रेसचे १०० सदस्य कोरोनादूत म्हणून काम करणार आहेत.

या उपक्रमाचे उदघाटन नुकतेच ना. थोरात यांच्या उपस्थितीत झाले. ना. थोरात यांनी नवे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांना या पदावर नियुक्ती देताना नगर शहरातून विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी आतापासूनच सुरू करण्याचीही सूचना केली होती.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment