अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यात काही भागात वादळी वार्यासह जोरदार पाऊस झाला.
काळ (सोमवार) पारनेर तालुक्यामध्ये अनेक भागांत ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने परिसर जलमय झाल्याचे पाहायला मिळाले.
पारनेर शहर, हंगा, शहाजापुर, वडनेर, लोणी हवेली, व परिसरामध्ये मुसळधार पाऊस तर काही भागांमध्ये ढगफुटी सारखा प्रकार झाला. त्यामुळे परिसरातील ओढे नाला नदी यांना मोठ्या स्वरूपामध्ये पूर आला होता.
तसेच शेतीचे बर्याच ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यामध्ये अनेक दिवसापासून पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सतत होणाऱ्या पावसामुळे शेतकरी हैराण झाला आहे.
अतिपावसामुळे खरीप पिकांची चांगलीच दाणादाण उडाली. मका, कपाशी, ऊस, सोयाबीन पिकाचे नुकसान होऊन उभी असलेले पिके भुईसपाट झाले आहे.
या पावसामुळे येथील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाने कुठे शेतात पाणी साचले. तर कुठे बाजरी पीक भूईसपाट झाले.
परिसरातील बाजरी, भुईमूग, मका, ऊस, जनावरांचा चारा आदी पिकांमध्ये पाणी साचले. त्यामध्ये वाघुंडे येथील दत्त मंदिर पाण्याखाली आले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved