‘ह्या’ आरटीओ कार्यालयात ‘असे’ घडले; ‘ते’भडकले अन कारवाईचे पत्र दिले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- मान्यवरांच्या प्रतिमा, फोटो केवळ देखावा म्हणून कार्यालयामध्ये लावले जात नाही तर त्या मागे अनेक कारणेही असतात. परंतु या गोष्टींना हरताळ फासल्याचा प्रकार श्रीरामपूर आरटीओ ऑफिसमध्ये समोर आला आहे.

येथील प्रकाश चित्ते यांना या कार्यालयाच्या अडगळीच्या खोलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे फोटो टाकलेले आढळले.

याबाबत त्यांनी उपप्रादेशिक अधिकारी खान यांना चांगलाच जाब विचारला. त्यानंतर खान यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल तत्काळ तोंडी माफी मागून लेखी दिलगिरी व्यक्त करून दोषींवर कारवाईचे लेखी पत्र दिले.

याबाबत अधिक माहिती अशी: एका कार्यकर्त्याच्या कामाकरिता भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते हे आरटीओ कार्यालयात गेले होते.

तेथे त्यांना दुसर्‍या मजल्यावरील अडगळीच्या खोलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा फोटो टाकलेला आढळला.

या प्रकाराचे फोटो काढून ही घटना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी असलेल्या खान यांच्या निदर्शनास आणून दिली. खान यांनी तोंडी माफी मागितली.

तेव्हा चित्ते यांनी मला लेखी द्या, अशी मागणी केली यावर खान यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल लेखी दिलगिरी व्यक्त करून दोषींवर कारवाई करण्याचे लेखी पत्र दिले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment