अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-नगर-मनमाड महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाली असून, या महामार्गावरून प्रवास करतांना वाहन चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतं आहे. रस्त्यावर मोठं-मोठे खड्डे पडले असने नेहमीच या रस्त्यावर अपघात होतं असतात.
या अपघातात अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागतो. वाहनांचे देखील मोठे नुकसान होते. त्यामुळे या रस्त्याची लवकरात-लवकर दुरूस्ती करावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा अनेक राजकीय पक्ष,तसेच सामाजिक संघटनांनी दिला होता.
अशाच पध्दतीने भाजपचे नेते तथा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर या प्रश्ना संदर्भात मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
या मार्गाच्या तातडीच्या दुरूस्तीसाठी 40 कोटी रुपये मंजूर करण्याची ग्वाही मंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्याची माहिती माजी मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी दिली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved