कोविड सेंटरमध्ये महिलांची सुरक्षा वाऱ्यावर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :-कोरोनाचा कहर सर्वत्र वाढत असल्याने परिस्थिती गंभीर होत चालली आहे. पुरुषांबरोबरच महिला रुग्णही वाढत आहेत. महाराष्ट्रात अनेक कोविड सेंटरमध्ये महिलांवर अत्याचार झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

त्यामुळे कोविडमध्ये महिलांचा सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे या गंभीर परिस्थितीचा विचार करुन प्रत्येक कोविड सेंटरमध्ये महिलांसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्याचे आदेश द्यावेत,

तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र्य महिला सिक्युरिटी कार्ड कोविड सेंटरमध्ये नेमण्यात यावेत, तसेच संपूर्ण कोविड सेंटरमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात यावी,

या मागणीचे निवेदन भाजपा महिला मोर्चाच्यावतीने मनपाचे प्रभारी उपायुक्त संतोष लांडगे यांना प्रदेश सरचिटणीस सुरेखा विद्ये व माजी शहर जिल्हाध्यक्षा गिता गिल्डा यांनी दिली.

हेच निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय व पोलिस अधिक्षक कार्यालयासही देण्यात आले. निवेदनात पुढे म्हटले आहे की, गरोदर महिलांची बाळंतपणे खाजगी डॉक्टर्स त्यांच्या रुग्णालयात करण्यास तयार होत नाहीत,

त्यामुळे गरोदर महिलांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. तरी गरोदर महिलांची सर्व प्रसुतीगृहाच्या डॉक्टरांना अडवणुक न करता बाळंतपण करण्याच्या सूचना करण्यात याव्यात.

तसेच कोविड सेंटरमधील कोरोना बाधित बाळंतीन महिलेला प्रसुतीतज्ञ डॉक्टरांकडूनही उपचार मिळावेत, याची व्यवस्था प्रशासनाने करावी.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment