अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- ग्रामविकास विभागाने केंद्र शासनाच्या श्यामाप्रसाद मुखर्जी रूर्बन अभियानांतर्गत जिल्ह्यातील काही गावांचा समूह निवडून त्याचा कृती विकास आराखडा तयार करण्यासाठी प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 च्या तरतुदीनुसार अधिसूचना काढून नियोजन प्राधिकरण निश्चित करण्यात येणार आहे.
अशा प्रकारे तयार केलेले विकास आराखडे एकात्मिक कृती आराखड्यात समाविष्ट केले जातील व तेथील सर्व रचनात्मक विकास कामांचे अधिकार नियोजन प्राधिकरण म्हणून जिल्हा परिषदेला प्राप्त होणार आहेत.
या अभियानांतर्गत जिल्ह्यातील पाथर्डी, कर्जत आणि शेवगाव तालुक्यातील 17 गावांची निवड झाली आहे. या गावांतील विकासकामे तसेच बिगरशेती परवाने, बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार आता जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहेत.
ह्या गावांचा समावेश –
– पाथर्डी तालुका: तिसगाव, मांडवे, सोमठाणे खुर्द, पारेवाडी, शिरापूर, कौडगाव, देवराई, निवडुंगे, कासार पिंपळगाव, मढी – कर्जत तालुका: मिरजगाव, गोंधर्डी, राजरतन, कोकणगाव
– शेवगाव तालुका: बोधेगाव, हातगाव, सोनविहिर
याचा विकास करणार
– या अभियानातून गावांत केंद्र व राज्य शासनाच्या योजना राबविण्याबरोबरच गावात कौशल्य विकास प्रशिक्षण, कृषी प्रक्रिया, मोबाईल आरोग्य युनिट,
शाळा सुधारणा, स्वच्छता, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, गावांतर्गत गटारे, रस्त्यावरील दिवे, रस्ते जोडणी, सार्वजनिक वाहतूक, गॅस कनेक्शन, डिजिटल साक्षरता, नागरिक सेवा केंद्र यांचा विकास अपेक्षित आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved