आ.रोहित पवार ठरले ‘आरोग्य दूत’

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :-जामखेड शहरातील आरोळे हॉस्पिटल येथे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरवर कर्जत येथे 50 तर जामखेड येथे 70 बेड उपलब्ध करण्यात आले आहेत.

या कौतुकास्पद कामासाठी लोकप्रिय आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कर्जत-जामखेड मतदारसंघात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

मात्र या संकटापासुन प्रत्येक नागरीकाची सुटका करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते तथा कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आ.रोहित पवारांनी विविध सुविधा व उपाययोजना अंमलात आणल्या आहेत.

या कोविड सेंटरला उपलब्ध करून दिलेल्या सर्वच बेडला ऑक्सिजन पुरवण्यासाठी 250 लिटरचे दोन सिलेंडर टॅंक देण्यात आले आहेत. जामखेडलाही असेच दोन सिलेंडर टॅंक उपलब्ध करण्यात आले आहेत.

त्यामुळे एकाच वेळी सर्व रुग्णांना गरज भासल्यास ऑक्सिजन सुविधा पुरवली जाऊ शकणार आहे. जामखेडसाठी अगोदर 3 व्हेंटिलेटर होते. आता आमदार पवारांच्या पुढाकाराने नव्याने 4 व्हेंटिलेटर मिळाले.

आणखी 2 व्हेंटिलेटर असे एकूण 9 व्हेंटिलेटर अत्यावश्यक सुविधा म्हणून उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे जामखेडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

रुग्ण वाहिकांचा तुटवडा पाहता कोणत्याही आणि कुठल्याही रुग्णाला वेळेत उपचार घेता यावेत यासाठी कर्जत तालुक्यासाठी 1 व जामखेड तालुक्यासाठी 1 अशा २ रुग्णवाहिका आ.रोहित पवारांच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत.

तसेच कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी आ.पवारांच्या माध्यमातुन मोफत मेस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

वैद्यकीय सुविधेपासुन इतर सर्वच लागणाऱ्या बाबी आ. पवार यांनी मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत.त्यामुळे विविध सुविधा व उपाय योजनांमुळे कोरोना रुग्णांना आधार मिळाला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment