त्याने केला ‘तसा’ फोटो व्हायरल; पोलीस पोहोचले घरी, आणि मग…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा चांगलीच सतर्क झाली आहे. अशा काळामध्ये काही अनुचित प्रकार करणे आता गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या चांगलेच अंगलट येणार येत आहे.

अशीच एक घटना नुकतीच नेवासे तालुक्यात घडली. योगेश शिवाजी चावरे (वय २२, रा. नजीक चिंचोली, ता. नेवासा ) या तरुणाने हातामध्ये तलवार घेऊन फोटो काढून तो सोशल मीडिया व्हायरल केला.

याबाबतची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी नेवासा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी दोन पंचासह योगेशच्या घरावर छापा टाकला. यावेळी त्याच्याकडे आठ हजार रुपये किमतीच्या दोन तलवारी सापडल्या.

या तरुणाच्या विरोधात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला काल रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अधिक चौकशी केली असता योगेश या तलवारी विनापरवाना व बेकायदेशीररित्या स्वतःजवळ बाळगत असल्याचे निदर्शनास आले. पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे अधिक तपास करीत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment