अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीनेच तिचा गळा दाबून खून केला. तसेच नातेवाईकांना पत्नीचा करोनाने मृत्यू झाल्याचा बनाव रचला. मात्र हा बनाव मृतदेहाच्या उत्तरीय तपासनीनंतर उघड झाला.
राहुरी पोलिसांनी आरोपीस अटक केली असून, महिलेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना दि. 23 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास राहुरी येथे तनपुरेवाडीत घडली. याप्रकरणी पती सोमनाथ इंगवले याला राहुरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
अनिता सोमनाथ इंगवले (वय 26) असे मयत महिलेचे नाव आहे. अनिता ही विवाहित तरूणी आपले पती व दोन लहान मुलांसह राहुरी शहरातील तनपुरेवाडी येथे राहते. काही वर्षांपूर्वीच त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर काही दिवसातच अनिता इंगवले हिचा पती सोमनाथ इंगवले हा अनिताच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ व मारहाण करीत होता.
त्याच कारणावरून त्यांच्यात नेहमी भांडणे होत असे, अशी माहिती मयत अनिताच्या नातेवाईकांनी दिली. याबाबत अधिक माहिती अशी की, अनिता सोमनाथ इंगवले (वय 26) ही विवाहिता पती व दोन लहान मुलांसह राहुरी शहरातील तनपुरेवाडी येथे राहात होती.
विवाहानंतर काही दिवसांतच पती सोमनाथ लक्ष्मण इंगवले पत्नी अनिता हिच्या चारित्र्यावर संशय घेत शिवीगाळ व मारहाण करत होता. दि. 23 सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजे दरम्यान आरोपी सोमनाथ याने त्याची पत्नी अनिता हिचा गळा दाबून खून केला.
घटनेची माहिती मिळताच सर्व नातेवाईकांनी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. यावेळी मयत अनिता हिच्या गळ्याच्या मध्यभागी काळसर व लालसर निशाण दिसून आले. तिचे शवविच्छेदन केल्यानंतर तिचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाला आहे. अशी माहिती तेथील वैद्यकीय अधिकारी सायगावकर यांनी दिली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved