अहमदनगर ब्रेकिंग : रास्ता रोकोचा प्रयत्न करणार्‍या कार्यकर्त्यांना अटक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-  केंद्र सरकारने पारीत केलेल्या शेतकरी व कामगार विधेयकाच्या निषेधार्थ भारत बंदच्या हाकेला प्रतिसाद देत भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अ.भा. किसान सभा व डावे पक्षांच्या वतीने शहरातील मार्केटयार्ड चौकात निदर्शने करुन नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यावेळी पोलीसांनी आंदोलकांना अटक केली. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.

या आंदोलनात अ‍ॅड.कॉ. सुभाष लांडे, बन्सी सातपुते, कॉ.भारती न्यालपेल्ली, कॉ.बहिरनाथ वाकळे, अ‍ॅड.सुधीर टोकेकर, अंबादास दौंड, तुषार सोनवणे, चंद्रकांत माळी, संतोष गायकवाड, दिपक शिरसाठ, सतीश निमसे,

कार्तिक पासलकर, सतीश पवार, विजय केदारे, सुनिल ठाकरे, आकाश साठे आदि सहभागी झाले होते. आंदोलकांनी मोदी प्रणित भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

तर कोरोनाचा गैरफायदा घेऊन शेतकरी, कामगार व जनविरोधी घेतलेली धोरणे रद्द करण्याची मागणी केली. यावेळी बंदोबस्तासाठी पोलीसांचा मोठा फौजफाटा उपस्थित होता.

रस्त्यावर येण्याचा प्रयत्न करणार्‍या आंदोलकांना पोलीसांनी अटक केली. केंद्र सरकारने पारित केलेल्या विधेयकाला विरोध दर्शविण्यासाठी

भाकपने पुकारलेल्या देशव्यापी बंदमध्ये 250 पेक्षा जास्त शेतकरी संघटना व 200 पेक्षा जास्त कामगार संघटना उतरल्या आहेत.

लोकसभा व राज्यसभेत पाशवी बहुमताच्या जोरावर भारतीय नागरिकांचा विरोध असताना शेतकरी व कामगार विरोधी विधेयक मंजुर करण्यात आले आहे.

हा भारतीय लोकशाहीचा अपमान असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. शेतकरी विरोधी तिन्ही विधेयक रद्द करावे, विद्यार्थी विरोधी नवीन शैक्षणिक धोरण रद्द व्हावे,

कामगारविरोधी कंपनी विधेयक रद्द करा, गॅस, पेट्रोल, डिझेल यांची दरवाढ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment