वंचित बहुजन आघाडीच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यावर गुन्हे दाखल करणार : प्रतीक बारसे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-  महाराष्ट्रातील बहुजनची शक्ती म्हणून उदयास आलेल्या बहुजन वंचित आघाडीच्या नावाने या आघाडीला बदनाम करण्याच्या हेतूने अनेक हितशत्रूनि बहुजन आघाडीच्या नावाने व्हॉटस अँप ,ट्विटर ,फेसबुक ,इन्स्टाग्राम आदी सोशल मीडिया वरती वंचित बहुजन आघाडीच्या नावाने ग्रुप तयार केले आहेत अकाउंट उघडले आहेत आणि त्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या विचारधारा विरुद्ध पोस्ट केल्या जात आहेत .

यामुळे सर्वसाम व्यक्तीकडून सोशल मीडियाच्या बाबत कडून चुकीचा संदेश जात आहे . सध्या वंचित बहुजन आघाडी कडे युवक मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असून

केवळ अश्या अधिकृत नसणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून समाजमन दूषित करणारे मेसेज फॉरवर्ड केले जातात त्यामुळे अश्या अशी पेज बंद करण्यात यावीत तसेच अश्या पेजवरून ,

ग्रुपवरून काही आक्षेपाहार्य सामुग्री प्रसारित झाल्यास वंचित बहुजन आघाडीचा त्याच्याशी कोणताही संबंध नसेल . तसेच असे पेज ,ग्रुप अथवा नाव वापरणाऱ्या लोकांना शोधून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे .

वंचित बहुजन आघाडी हा स्वतंत्र विचारधारा असणारा पक्ष असून या पक्ष्याच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीने पक्षाचे पदाधिकारी निवडले जातात .

परंतु याआधीचे काही लोक स्वार्थी हेतूने ,तसेच पक्ष बदनाम होईल असे वर्तुणुक करणारे लोक काही एक संबंध नसताना बहुजन वंचित आघाडीचे पदाधिकारी असल्याचे भासवून आणि तश्या प्रकारचे लेटरपॅड वापरून गैरवापर करतात

अश्या अनधिकृत व्यक्तीवर देखील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अहमदनगर चे नवनिर्वाचित अध्यक्ष्य प्रतीक बारसे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे .

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment