नामदार शंकरराव गडाख झाले आक्रमक, म्हणाले भाजपचा भ्रम होता…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-  राज्यात सत्ता स्थापन न करू शकलेल्या भाजपकडून नेहमीच महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जाते. मात्र भाजपच्या टीकाकारांना राज्याचे जलसंंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.

एवढ्या पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करणं हे भाजपच्या कल्पनेपलिकडचं आहे. आमच्याशिवाय कुणालाच सरकार चालवता येणार नाही असा भाजपचा भ्रम होता आणि तो महाविकासआघाडीच्या प्रयोगाने संपला आहे.

त्यामुळेच विरोधकांची आगपाखड सुरु आहे, असं मत राज्याचे जलसंंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी व्यक्त केलं. शंकरराव गडाख म्हणाले, अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणावरून विरोधकांनी मोठे राजकारण केले.

मात्र राज्यात कोरोनाचे संकट असताना असे राजकारण करत बसने चुकीचे आहे. एकत्रित येऊन कोरोनाशी लढण्यासाठी जे सहकार्य विरोधी पक्षांचं हवं होतं ते म्हणावं तसं मिळत नाही.

लोकांचं लक्ष विचलित केलं जातंय. सर्व पक्ष एकत्रित येऊ शकतील हे त्यांच्या कल्पने पलिकडचं होतं. असे पक्ष एकत्र आले आणि त्यांनी सरकार स्थापन केलं.

त्यांना वाटत होतं आमच्याशिवाय कुणालाच सरकार चालवता येणार नाही. त्यांच्या या समजाला तडे जात आहेत. त्यामुळेच ते असे छोटे मोठे प्रकरणं फार मोठे भासवण्याचा प्रयत्न करत आहेत,” असंही शंकरराव गडाख यांनी नमूद केलं.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment