दरोडेखोरांची टोळी जेरबंद,पहा अहमदनगर जिल्ह्यात कुठे…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- खैरी निमगाव येथील काही सराईत गुन्हेगार कारमधून हत्यारांसह दरोडा टाकण्याच्या उद्देशाने जाणार असल्याची गुप्त माहिती श्रीरामपूर शहर पोलिसांना मिळाली.

पोलीसांनी गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास संगमनेर रोडवरील एसटी कार्यशाळेजवळ ही टोळी पकडली. पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट,

सहायक पोलिस निरीक्षक समाधान पाटील, संभाजी पाटील, दत्तात्रय ऊजे, संतोष बहाकर, जालिदर लोंढे, पंकज गोसावी, अर्जुन पोकळे, सुनील दिघे, किशोर जाधव, महेंद्र पवार, गणेश गावडे,

रघुवीर कारखले, राजू महेर आदींच्या पथकाने खंडाळा परिसरातील एसटी कार्यशाळेजवळ सापळा लावला. रात्री अकराच्या सुमारास मिळालेल्या पांढऱ्या रंगाची कार येताच पोलिस सावध झाले.

मात्र, पोलिसांचा सुगावा गुन्हेगारांना लागला. त्यांनी गाडीचा वेग कमी केला. मागे बसलेला एकजण दरवाजा उघडून पळून गेला.

गाडीतील विक्रम ऊर्फ विकी नारायणसिंग परदेशी (३० वर्षे), प्रसाद भाऊसाहेब वदक (२४ वर्षे), प्रशांत साईनाथ लेकुरवाळे (२५ वर्षे), सागर अप्पासाहेब दुशिंग (३० वर्षे, सर्व राहणार निमगाव खैरी) यांना ताब्यात घेतले.

भक्ती काळे हा पळून जाण्यात यशस्वी झाला. या टोळीकडून कार, मोबाइल, तलवारीसह धारदार शस्त्रे व मिरची पूड पोलिसांनी जप्त केली. कॉन्स्टेबल किशोर जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

पकडलेल्या विक्रम परदेशी याच्यावर श्रीरामपूर, लोणी, शिर्डी, संगमनेर, कोपरगाव, अंबड (नाशिक), खांडेश्वर (मुंबई) आदी पोलिस ठाण्यांत दहा गुन्हे, तर प्रसाद वदक याच्यावर श्रीरामपूर,

शिर्डी, कोपरगाव, नारायणगाव पोलिस ठाण्यात आठ गुन्हे, प्रशांत लेकुरवाळे याच्यावर श्रीरामपूर, कोपरगाव, नारायणगाव आदी ठिकाणी आठ, सागर दुशिंग याच्यावर श्रीरामपूर पोलिस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment