जिल्हा रुग्णालयात रेमडेसिव्हीर इजेक्शनचा तातडीने पुरवठा करावा अन्यथा जिल्हा रुग्णालय समोर ठिय्या आंदोलन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना रुग्णांसाठी रेमडेसिव्हीर इजेक्शनचा पुरवठा तातडीने करण्याची मागणी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पाठविण्यात आले असल्याची माहिती छावा क्रांतीवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे यांनी दिली. रेमडेसिव्हीर इजेक्शन उपलब्ध नसल्याने जिल्हा रुग्णालयातील सर्वसामान्य कुटुंबातील कोरोना रुग्णांची मोठी हेळसांड होत असल्याने

सदर प्रश्‍न न सुटल्यास जिल्हा रुग्णालय समोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. नगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हा अतिशय वेगाने फैलावत आहे. याने ग्रामीण भागात जास्त तीव्र रूप धारण केलेले आहे.

कोरोनाग्रस्त असलेल्या रुग्णांना श्‍वसनाचा त्रास होत असताना फुफ्फुसावरील संसर्ग थांबविण्यासाठी सध्या रेमडेसिव्हीर इजेक्शनचा वापर केला जात आहे. याचा वापर प्रभावी असल्यामुळे या इजेक्शनला मोठी मागणी वाढली आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालय येथे या इजेक्शनचा साठा संपलेला असून,

याचा गैरफायदा घेत खाजगी रुग्णालयांमध्ये याचे बिल जास्त आकारले जात आहे. या इंजेक्शनच्या नावाखाली खाजगी रुग्णालय सर्वसामान्य रुग्णांची लूट करीत आहे. हा कृत्रिम तुटवडा दाखवण्यात येत असून, खाजगी रूग्णालय कोरोना महामारीत सर्वसामान्यांची लूट करताना दिसत आहे.

मात्र शासनाने नेमलेल्या लेखा परिक्षण समिती मूग गिळून बसले आहे. महापालिका आयुक्त यांनी नियुक्त केले लेखा परिक्षण समिती कागदावरच असल्याने त्यांचे हॉस्पिटल सोबत साटेलोटे असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी लेखी पत्राद्वारे आदेश देऊन

सरकारी परिपत्रकानुसार बिल आकारणी न करणार्‍या खाजगी हॉस्पिटल विरुद्ध कारवाई करून अहवाल द्यावा, सर्व खाजगी हॉस्पिटलने सरकारने घोषित केलेल्या 21 मे 2020 च्या परिपत्रकानुसार बिलाची आकारणी करावी, जादा रक्कम अथवा इतर खर्चाचा त्यात समावेश करणार्‍या हॉस्पिटलवर कारवाई करावी,

जिल्हा मोठा असल्याने त्यात रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सर्वसामान्य रुग्णांचा विचार करुन जास्तीत जास्त रेमडेसिव्हीर इजेक्शनचा पुरवठा जिल्हा रुग्णालयांमध्ये करण्याची मागणी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment