दारूबंदी असताना दारूची विक्री करणाऱ्यास गावकऱ्यांनी बदडले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये गावकऱ्यांच्या पुढाकाराने दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान राहुरी तालुक्यातील वळण येथे ग्रामस्थांनी दारूबंदी केली आहे.

असे असतानाही राजरोसपणे दारू विक्री करणा-यास ग्रामस्थांनी चोपले. ही घटना शनिवारी (दि.२६ सप्टेंबर) रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे.

संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी यावेळी दारूच्या बाटल्या व ड्रम फोडले. दरम्यान या घटनेची माहिती समजताच राहुरी पोलीस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

ग्रामस्थांनी या दारू विक्रेत्यास अनेक वेळा दारू विक्री बंद करण्याची तंबी दिली होती. परंतु त्याने शनिवारी दारू विक्री बंद कर असे सांगण्यासाठी गेलेल्या तरुणांंना अरेरावीची भाषा वापरली. यामुळे संतप्त झालेल्या तरुणांनी व ग्रामस्थांनी त्यास चांगलाच चोप दिला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment