वृद्धेला कुऱ्हाडीने मारहाण; एकाला अटक करून अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- दारुच्या नशेत मागासवर्गीय कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ करून वृद्ध महिलेला कुऱ्हाडीने मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी दुपारी ३.३० वाजता संगमनेर खुर्द येथील सिद्धकला हॉस्पिटलसमोर घडली.

या प्रकरणी शहर पोलिसांनी एकाला अटक करून अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. सिद्धकला हॉस्पिटलसमोर कदम कुटुंब राहते. मनीषा कदम यांच्या पतीचे निधन झाल्याने दोन मुले व आईसमवेत त्या राहतात.

परिसरात राहणाऱ्या नंदू वाल्मिक गांजवे याने दारूच्या नशेत कदम कुटुंबीयांना शिवीगाळ करत येथे राहू नका, असा दम दिला.

कदम कुटुंबांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला असता त्याने घरातून कुऱ्हाड आणून मनीषा यांची आई कलावती दामोधर झालटे यांच्या हातावर व पायावर कुऱ्हाडीने वार केले. त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment