राठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते पण…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- नगर शहर शिवसेनेतील वाढती गटबाजी तसेच मनपा स्थायी समिती सभापतीपद निवडीत सेनेची फसवणूक झाल्याच्या होत असलेल्या दाव्यांच्या पार्श्वभूमीवर शहर सेनेच्या सद्यस्थितीवर अन्य पक्षीयांनी अस्वस्थता व्यक्त करीत मांडलेली खंत शहरात चर्चेची झाली आहे.

शिवसेनेचे उपनेते (स्व.) अनिलभय्या राठोड यांच्या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांसह काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच शहरातील व्यापारी प्रतिनिधींनीही शहर शिवसेनेच्या भविष्यातील वाटचालीवर भाष्य केले.

दरम्यान नगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, महापालिकेचे भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे व नगरचे भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांची राठोड श्रद्धांजली सभेस अनुपस्थिती चर्चेची झाली.

राठोड हयात असताना या तिघांशी त्यांचे राजकीय मतभेद होते व त्यावरून त्यांच्यात नेहमी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत असत. या पार्श्वभूमीवर, भारतीय संस्कृतीत मरणांती वैराणी…

असे म्हटले जात असल्याने व मरणानंतर एखाद्याविषय़ीचै वैर संपल्याचे मानले जात असताना राठोडांच्या श्रद्धांजली सभेला या तिन्ही नेत्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते, असे मतही शिवसेनेच्या काही समर्थकांतून व्यक्त होत होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment