वंचित बहुजन आघाडी बिहारच्या निवडणुकीत उतरणार ?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी परत एकदा ‘एआयएमआयएम’चे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी यांना मैत्रीसाठी अप्रत्यक्षपणे साद घातली आहे.

बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम आणि दलित मते एकत्र आली तर ‘चमत्कार’ होऊ शकतो, असे म्हणत अॅड. आंबेडकर यांनी बिहारच्या निवडणुकीत उतरण्याचे सूतोवाच केले आहे.

ऑक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातला वंचित बहुजन आघाडी हा पक्ष उतरणार आहे. यासंदर्भात वंचितचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की,

बिहारमध्ये १६ टक्के मुस्लिम असून १८ टक्के दलित आहेत. असे ४० टक्के मतदार ज्या बाजूला असतील ते सरकारमध्ये निर्णायक भूमिका नक्की बजावू शकतात.

आम्ही बिहारमध्ये जात आहोत, त्यामागे भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) पराभूत करणे हा एकमेव हेतू आहे. जे महाराष्ट्रात वंचित घडवू शकली नाही ते बिहारमध्ये नक्की घडवेल, असा आशावाद अॅड. आंबेडकर यांनी व्यक्त केला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment