अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यातील खड्डे सध्या चांगलेच गाजत आहे. वाढत्या खड्यांचे लोकप्रतिनिधींकडून राजकारण केले जात आहे. आरोप – प्रत्यारोप सुरूच आहे, मात्र यामध्ये मूळ प्रश्न हा काही सोडविला जात नाही.
रस्त्यावरील खड्ड्याना वैतागलेल्या तरुणांनी खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत प्रशासनाचा निषेध केला आहे. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे तरुणांनी वांबोरी- डोंगरगण- नगर रस्त्यातील खड्ड्यांभोवती रांगोळी काढून
खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करुन आंदोलन केले. प्रशासनाचा निषेध करून, रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती केली नाही. तर, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते विष्णू ढवळे यांनी दिला.
तसे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले. वांबोरी- डोंगरगण- नगर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे. रस्त्यात तीन ते चार फुटांपर्यंतचे खड्डे आहेत.
रस्त्यातील खड्ड्यांमुळे रोज अपघात घडत आहेत. गंभीर जखमी प्रवाशांना प्राणाला मुकावे लागत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याला तक्रारी करूनही खड्ड्यांचे दुरुस्ती होत नाही.
त्यामुळे संतप्त तरुणांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. या आंदोलनात विष्णू ढवळे, रंगनाथ गवते, अशोक तुपे, दीपक साखरे, राम क्षीरसागर, आदेश सत्रे व इतर तरुणांनी सहभाग नोंदविला होता.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved