नेवासा :- औरंगाबादहून अहमदनगरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या ईरटीगा (क्र. एमएच २१ एएक्स ११०) या कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कारने नेवासा फाटा येथील स्टेट बँकेसमोरील दुभाजकाला जोरदार धडक दिली. यानंतर कारने तीन ते चार पलटी खाल्ल्याने गाडीतील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.
अपघात इतका भीषण होता की यात इरटिगा गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला असून गाडीचे चारही चाक वर झाल्याने गाडीतील मृत व जखमींना बाहेर काढताना मोठी कसरत करावी लागली. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

अपघातात जालना येथील भाजपचे जेष्ठ नेते व विद्यमान जिल्हा सरचिटणीस चंद्रशेखर बाळासाहेब घन (वय ५०, हल्ली रा. औरंगाबाद) यांच्या डोक्याला जबर मार लागून अतिरक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृत चंद्रशेखर घन हे प्रगतशील शेतकरी म्हणून देखील जालना व औरंगाबाद जिल्ह्यास परिचित होते.
तसेच त्यांच्याबरोबर असणारे नारायण भिकाजी कुमटे (वय ५०, रा. ता. बदनापूर, जि.जालना) हे या अपघातात गंभीर जखमी झाले. मृत चंद्रशेखर घन हे केंद्रीय मंत्री खासदार रावसाहेब दानवे यांच्या अत्यंत जवळचे व विश्वासू कार्यकर्ते असल्याचे समजते.
- नगर – सोलापूर महामार्गावर भीषण अपघातात अहिल्यानगरच्या लष्करी जवानाचा जागीच मृत्यू
- धक्कादायक अपडेट! Instagram वर आलं जबरदस्त फीचर — आता कोणाच्याही “जवळच्या मित्र” यादीतून एका क्लिकमध्ये बाहेर!
- NASA ने तयार केला ‘सुपरमाइंड’! 500 वर्षांचे काम 24 तासांत—आता मंगळ आणि चंद्रावर राज्य करण्याची तयारी!
- मोठा धक्का! Apple २०२६ मध्ये स्वस्त आयफोन रद्द — आता फक्त महागडेच फोन येणार!
- तुमचा डॉक्टर खराच आहे का? मोबाईल उघडा आणि २ मिनिटांत पूर्ण सत्य समोर आणा!













