‘त्या’ शेतकऱ्यांना आनंदाची बातमी; ‘इतके’ पैसे झाले जमा

Published on -

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :-  सध्या कोरोना आणि आता अति पावसामुळे पिडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

हवामान आधारित फळपीक विमा घेतलेल्या द्राक्ष व आंबा उत्पादक शेतकर्‍यांच्या खात्यावर 10 लाख 55 हजार 518 रुपये जमा झाल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे.

महाविकास आघाडीचे सरकार आले आणि सरकार आल्यापासून शेतकर्‍यांना न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

मागील सरकारच्या काळात थकीत असलेली शेतकर्‍यांची देणी मिळावी यासाठी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता.

त्या पाठपुराव्यामुळे आजपर्यंत कोपरगाव तालुक्यातील शेतकर्‍यांना ठिबक सिंचनचे एक कोटी चोवीस लाख रुपयांचे अनुदान महाविकास आघाडी सरकारकडून

मंजूर करण्यात येऊन अनुदानाची रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा झालेली आहे. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे 19.67 कोटी रुपयांची मदत

मतदार संघातील शेतकर्‍यांना महाविकास आघाडी सरकारने दिलेली आहे. अशा प्रकारे कोट्यवधी रुपयांची रक्कम शेतकर्‍यांना मिळाली आहे अशी माहितीहे आ. काळे यांनी दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe