नगर तालुक्यातील या गावात चार दिवस जनता कर्फ्यू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- नगर तालुक्यातील रुईछत्तीसी येथील कोरोना रुग्ण संख्येत गेल्या आठवड्यापासुन कोरोनाचे रुग्ण आढळून येऊ लागल्याने येथे अल्पावधीतच कोरोना रुग्णांची संख्या पंचवीसवर पोहोचली आहे.

पहिल्या टप्यात तालुक्यातील ८८ गावात कोरोना रुग्ण आढळले होते. त्यावेळी रुईछत्तीसी येथे केवळ चार रुग्ण आढळून आले होते. त्या नंतर आठ दिवसांचे लाॅकडाउन करण्यात आले होते.

त्या काळात कोरोनाची साखळी पुर्णपणे तुटली होती. त्या नंतर दोन महिने गावात एकही कोरोना रुग्ण आढळला नव्हता. रुईछत्तीसी परीसरातील सर्वातमोठी बाजारपेठ आहे.

येथे वाळकी, देऊळगाव, दहिगाव साकत, हातवळण,गुंणवडी आदी गावांचा संपर्क असतो.त्यामुळे हि साखळी तोडण्यासाठी २९ सप्टेंबर ते २ आॅक्टोंबर या दरम्यान जनता कर्फ्यू लागु असेल.

या दरम्यान अत्याआवश्यक सेवा सर्व नियमा प्रमाणे चालु असतील.असे ग्रामपंचायत प्रशासक रवींद्र कापरे यांनी सांगितले. कोरोनाबाबतच्या

उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाला सर्वतोपरी मदत करु अशी ग्वाही पंचायत समितीचे उपसभापती रवींद्र भापकर यांनी दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment