अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत असताना न्याय मागणेसाठी गेलेल्या महिलेस कोतवाली पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास वाघ याने जाळ्यात ओढले होते.
वाघ याने लग्नाचे अमिश दाखवून पीडितेवर वेळोवेळी अत्याचार केला तसेच तिचा गर्भपात केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
कोतवाली पोलिस ठाण्याचा तत्कालीन निरीक्षक विकास वाघ याच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला. स्त्रीलंपट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अधिकाऱ्याची अनेक प्रकरणे चव्हाट्यावर आली आहेत.
त्यामुळेच काही दिवसांपूर्वी त्याची आर्थिक गुन्हे शाखेत बदली झाली. कोतवाली पोलिस ठाण्याचा पदभार मिळाल्यानंतर काही दिवसातच वाघ याने आपले रंग दाखवले.
तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेशी ओळख वाढवून तिच्यावर अत्याचार करण्यापर्यंतची मजल त्याने मारली. जीवे मारण्याची धमकी देत वाघ याने महिलेवर वेळोवेळी अत्याचार केला.
त्यातून पीडित महिला गर्भवती राहिली. त्यानंतर वाघ याने तिला जीवे मारण्याची धमकी देत गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्या.
अखेर या अत्याचाराला त्रासलेल्या पीडित महिलेने कोतवाली पोलिस ठाणे गाठत वाघ याच्या विरोधात फिर्याद दिली. गुन्हा दाखल होताच वाघ पसार झाला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved