अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- सामान्य प्रसूतीनंतर डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नेवासा येथील देशमुख हॉस्पिटलमध्ये घडली.
वंदना सतीश पटारे (रा. वांबोरी ता. राहुरी जि. अहमदनगर) असे मृत महिलेचे नाव असून तिचा चुलत भाऊ गिरीश वसंतराव तनपुरे (वय 45) रा. भालगाव ता. नेवासा यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत असे म्हटले आहे की, माझी चुलत बहिण वंदना सतीश पटारे
(रा. वांबोरी ता. राहुरी जि. अहमदनगर) हिचे दिवस पूर्ण भरल्यानंतर 25 ऑक्टोबर 2018 रोजी पहाटे तीन ते साडेतीनच्या दरम्यान पोटात दुखू लागल्याने तिला डॉक्टर देशमुख हॉस्पिटल येथे डिलीव्हरीकरिता अॅडमिट करण्यात आले होते. तिची पहाटे सव्वाचार वाजता नॉर्मल डिलीव्हरी झाली.
परंतु बाळास बाळाला श्वासाचा त्रास असल्याचे सांगितल्याने त्या बाळास विखे फाउंडेशन विळदघाट येथे उपचाराकरिता दाखल केले. त्याचदरम्यान, डॉ. देशमुख हॉस्पिटल मधील डॉ. सुनीता मनोज देशमुख व डॉ. सारिका संदीप देशमुख यांनी वंदना हिस अतिप्रमाणात रक्तस्त्राव होत असून
तिचा रक्तदाब वाढलेला असल्याचे सांगून तिस पुढील उपचारासाठी मातृसेवा हॉस्पिटल, अहमदनगर येथे अॅडमीट केले. त्यावेळी वंदना हिचे सोबत डॉ. सुनीता देशमुख व डॉ. मनोज देशमुख हे आले होते. तिथे तिच्यावर सकाळी 10 वाजेपर्यंत उपचार केल्यानंतर बहिण वंदना हिची तब्येत अधिक बिघडल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
त्यावर तिस पुढील उपचाराकरिता नोबेल हॉस्पिटल येथे दाखल केले. तिथे औषधोपचार सुरू असताना 26 ऑक्टोबर रोजी रात्री सव्वादहा वाजता ती मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मृत्यूनंतर 22 एप्रिल 2020 रोजी जिल्हा रुग्णालयाकडून पत्र प्राप्त झाले. त्यात रुग्णाला अतिरक्तस्त्राव झाल्यानंतर पीपीएच झाल्यानंतर दिलेली उपचार योजना पद्धतीप्रमाणे नाही असे नमूद केले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved