स्वीकृत नगरसेवकपदासाठी मोर्चेबांधणीस सुरुवात ; नाव बदलासाठी गांधी-कर्डिले यांची राजनिती ?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- महापालिका स्वीकृत नगरसेवकांची निवड उद्या (गुरूवार) होणार आहे. मागीलवेळी निकषात बसत नसल्याने रद्द ठरविण्यात आलेली नावे पुन्हा नव्याने दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली.

दरम्यान भाजपमध्ये मात्र नाव बदलासाठी राजनिती सुरू झाल्याची माहिती समजली आहे. महापौर बाबासाहेब वाकळे, गटनेते तथा उपमहापौर मालनताई ढोणे यांनी तत्कालीन शहरजिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांच्या अपरोक्ष रामदास आंधळे यांचे नाव दिले होते.

पक्षाकडून मात्र माजी नगरसेवक किशोर डागवाले यांचे नाव फायनल झाले होते. मात्र पक्ष आदेशाकडे दुर्लक्ष करत आंधळे यांचे नाव देण्यात आले. आता पुन्हा तेच नाव भाजपकडून देण्याचे घाटत असल्याचे समजते.

माजी खासदार दिलीप गांधी, माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचा मात्र या नावाला विरोध असल्याचे समजते.आंधळे यांनी स्वीकृत पदासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे.

नाव बदलासाठी गांधी-कर्डिले यांची राजनिती सुरू असल्याचे समजते. शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप हे तिन्ही पक्ष गत वेळी दिलेलीच नावे पुन्हा नव्याने आयुक्तांकडे सादर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जानेवारी 2020 मध्ये स्वीकृत नगरसेवकांची निवड सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादीने सुचविलेल्या नावांमध्ये सामाजिक संस्थेच्या प्रमाणपत्रांच्या त्रुटी काढत

तत्कालीन आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कोणाचीच शिफारस स्थायी समितीकडे केली नव्हती. त्यामुळे स्वीकृतची निवड झालीच नाही.

त्यानंतर आठ महिन्यांनी स्वीकृत नगरसेवक निवडीला मुहूर्त मिळाला आहे. उद्या (गुरूवार) दुपारी एक वाजता ऑनलाईन महासभा होणार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment