अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४७३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३८ हजार ८३८ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.५० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४७ ने वाढ झाली.

यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३८४९ इतकी झाली आहे. बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २०, अकोले १२, नगर ग्रामीण ०१, नेवासा ०४, पारनेर ०२,

पाथर्डी ०१, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ०२ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज ४७३ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला.

यामध्ये मनपा १०२, अकोले ५२, जामखेड ३५, कर्जत १९, कोपरगाव २३, नगर ग्रामीण २९, नेवासा २४, पारनेर १२, पाथर्डी २२,, राहाता ५०,

राहुरी १२, संगमनेर २७, शेवगाव २२, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर १६, कॅंटोन्मेंट ०५, मिलिटरी हॉस्पिटल १२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:३८८३८

उपचार सुरू असलेले रूग्ण:३८४९

मृत्यू:७०९* *एकूण रूग्ण संख्या:४३३९६

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

 

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment