अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- आपल्या कार्यपद्धतीमुळे अल्पवधीतच जनमानसात स्वतःची वेगळी ओळख करणारे व कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी एक वेगळाच विक्रम केला आहे.
त्यांचा हा विक्रम आता सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता.
दरम्यान त्यांचा वाढदिवस देखील एक चर्चेचा विषयच ठरला होता. पवारांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी बेरोजगारीवर उठवलेला आवाज ट्विटरवर देशात दुसऱ्या क्रमांकाचा ट्रेंड झाल्याने हा चर्चेचा विषय ठरला.
“रोहित पवार यांचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा करायचा का?”, अशी विचारणा एका यूजरने ट्विटरवर केली होती.
यावर पवार यांनी खास आपल्या शैलीत उत्तर देत म्हणाले कि, ‘बेरोजगारी ही देशातील भीषण समस्या असून याबाबत मी केंद्र सरकारचे अनेकदा लक्ष वेधले.
तसंच माझा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करा, बेरोजगारी या सामाजिक प्रश्नावर तुम्ही माझा वाढदिवस साजरा केला तर मला आनंदच होईल,’ अशा संयत आणि सकारात्मक शब्दांत त्यांनी संबंधित यूजरला उत्तर दिले.
परिणामी रोहित पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या तरुणांनी त्यांना शुभेच्छा देताना ट्विटरवर #रोहितपवारwithबेरोजगार हा हॅशटॅग चालवला. आणि विशेष म्हणजे ट्रेंडिंगमध्ये हा हॅशटॅग देशात दोन नंबरवर गेला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved