स्वच्छतेच्या कार्यात विखे पाटलांचा डंका…नगरपंचायतीला मिळाले 30 कोटी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- स्वच्छ शहर सुंदर शहर हे घोषवाक्य आपण ऐकलं असलं. केवळ आपला तालुका आपले शहर स्वच्छ ठेवल्याच्या बदल्यात जर तुम्हाला कोट्यवधी रुपयांचे बक्षीस मिळाले तर…. विश्वास बसत नाहीना, पण हे खरं आहे.

गावागावातील कचरा हटवून आपला परिसर, शहर, तालुका स्वच्छ ठेऊन शिर्डी नगरपंचायतीने तब्बल 30 कोटींचे बक्षीस मिळवले आहे. शिर्डी नगरपंचायतीला स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत दोन वेळा प्रत्येकी पंधरा कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले.

शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाणीवपूर्वक घेतलेला पुढाकार आणि साईसंस्थानने पुढे केलेला मदतीचा हात, यामुळे ही किमया घडली.

पाच वर्षांपूर्वी कचराकोंडीने हैराण झालेल्या बाबांच्या शिर्डीने आता स्वच्छ शहर म्हणून संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. “शिर्डी पॅटर्न’ राज्याला दिशादर्शक ठरला आहे.

साईसंस्थान नगरपंचायतीला शहर स्वच्छतेसाठी दरमहा बेचाळीस लाख रुपये देते. त्यातून एका कंपनीला ठेका देऊन शहराची स्वच्छता केली जाते. त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत शिर्डीचा लौकिक देशभर झाला.

साईसंस्थानचा साडेबारा कोटी रुपयांचा निधी शहर स्वच्छतेवर खर्च झाला. नगरपंचायतीला राज्य सरकारकडून स्वच्छ सर्वेक्षणाच्या बक्षिसापोटी तीस कोटी रुपये मिळाले.

खर्च झाला त्याहून दुप्पट पैसे शहर स्वच्छतेसाठी राज्य सरकारकडून मिळाले. शिर्डी शहराने सार्वजनिक स्वच्छतेत मोठी झेप घेतली.

विखे पाटलांच्या पुढाकाराने सुरु केलेला सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प देशपातळीवर स्वच्छतेबाबतची कामगिरी करताना फार महत्त्वाचा ठरला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment